मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते, असे म्हणत आव्हाडांनी काकडेंना टोला लगावला. आपल्याकडे आलेले पैसे कोणामुळे आले, कोणी काम दिले असेही आव्हाड म्हणाले.
खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर जोरदार निशाणा लावला आहे. पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते, असे म्हणत आव्हाडांनी काकडेंना टोला लगावला.
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर काकडे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांची पत्रकार परिषद म्हणजे नौटंकी असल्याचे काकडे म्हणाले होते. शरद पवार यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व करायचे कोणी यावरुन वाद चालल्याचे काकडे म्हणाले होते. या त्यांच्या टीकेला आज जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले. जास्त पैसे आले म्हणून अक्कल येत नसल्याचे त्यांनी काकडेंनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचा संबंध नसताना ईडीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. याच कारणामुळे मी राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार स्पष्ट केले.