महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुद्ध समजायला बुद्धी लागते, जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना टोला - गौतम बुद्ध

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गौतम बुद्ध यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाडांचा भिडेंना टोला

By

Published : Sep 30, 2019, 9:13 AM IST

मुंबई - शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गौतम बुद्ध यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अहो संभाजी भिडे बुद्ध समजायला बुद्धी लागते, असे ट्वीट करत आव्हाड यांनी भिडेंवर टीका केली.

भारताने जगाला बुद्ध दिला, पण बुद्धाचा उपयोग नाही असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा समाचार घेतला. बुद्ध समजायला बुद्धी लागते, बुद्ध केणालाही समजत नाही असे म्हणत आव्हाड यांनी भिडेंना लक्ष्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details