मुंबई :रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील इतर भागात उसळलेल्या दंगलीच्या घटनांबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. रामनवमी, हनुमान जयंती केवळ राज्यात दंगल घडवण्यासाठी असल्याचे दिसते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी दंगलीच्या घटनांवरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली. रामनवमीला संभाजीनगरमध्ये दंगल झाली. राम नवमी, हनुमान जयंतीला, दंगली नेहमीच होतात. सत्ताधारी युवकांना नोकरी देऊ शकत नाही. राज्यातील महागाई कमी करता न आल्याने सत्ताधाऱ्यांना धार्मिक कार्यक्रम करून मते मिळवण्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
आव्हाडांच्या वक्तव्यावर टीका :शिंदे गटनेते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड हे कट्टर हिंदुद्वेषी नेते असल्याचे या विधानावरून सिद्ध होते, असे ते म्हणाले. तसेच जितेंद्र आव्हाड हे आगामी वर्ष जातीय दंगलींनी भरलेले असेल असे ठासून सांगत असतील तर ते राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.