मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी ( BJP spokesperson Sudhanshu Trivedi ) यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असे वक्तव्य ( Chhatrapati Shivarai apologized Aurangzeb Five Times ) केले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले ( Jitendra Awad Tweet ) आहे.
jitendra Awhad: महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली म्हणणारा भाजप प्रवक्ता वेडाच - जितेंद्र आव्हाड - Governor Bhagat Singh Koshyari
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली म्हणणारा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता वेडाच असू शकतो असा टोलाही आपल्या माध्यमातून आव्हाडांनी लगावला ( Chhatrapati Shivarai apologized Aurangzeb Five Times ) आहे.
राज्यभरात संतापची लाट :सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापची लाट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही सुधांशू त्रिवेदी यांनी वृत्तवाहिनीवर केलेल्या या वक्तव्याबाबत ट्विट केले ( Jitendra Awad Tweet ) आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली म्हणणारा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता वेडाच असू शकतो असा टोलाही आपल्या माध्यमातून आव्हाडांनी लगावला आहे.
शिवाजी महाराज हे जुने आदर्श :संभाजीनगर येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले आहेत आता नवीन आदर्श नितीन गडकरी आणि शरद पवार हे आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ही राज्यपालांवर सर्व स्तरातून टीका झाली. त्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते असलेले सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब यांची पाच वेळा माफी मागितली असे वक्तव्य करून एक नवीन वाद तयार केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाला घेतला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अद्यापही शब्द काढला नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.