महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Awhad : महाराजांच्या विकृतीकरणाच्या विरोधात रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत उभा राहीन - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीचा दाखवणाऱ्यांच्या विरोधात आपण लढत राहू असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सध्या काही लोक विकृतीकरण करत आहे. या विकृतीकरणाच्या विरोधात आपण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नेहमीच उभे राहू, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 13, 2022, 7:01 PM IST

मुंबई : हर हर महादेव चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मारहाण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर ठाणे जिल्हा न्यायालयाकडून जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र जामीन मिळाल्यानंतर ही माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Former Minister Jitendra Awhad ) यांनी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत दाखवलेला इतिहास चुकीचा असल्याचे सांगितलं होते.

विकृतकरणाच्या विरोधात शेवटपर्यंत लढा देणार - जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीचा दाखवणाऱ्यांच्या विरोधात आपण लढत राहू असा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत सध्या काही लोक विकृतीकरण करत आहे. या विकृतीकरणाच्या विरोधात आपण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत नेहमीच उभे राहू, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

आव्हाडांना अटक व जामीन - हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे. गेल्या काही वर्षात जाणून-बुजून काही लोक चुकीचा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे. ठाण्याच्या एका मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकारांना झालेल्या मारहाणी नंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र राजकीय सूडबुद्धीतून आपल्यावर ही कारवाई झाली असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता तर कोणतेही कारण नसताना जितेंद्र आव्हाड केवळ आरडा ओरड करतात त्यांचा तो स्वभाव आहे, असा टोला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर लगावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details