मुंबई - दिल्लीत एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहण्यात आलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचे नाव आहे. यावरुन भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी महाराज होणे नाही. हे मनाला पटत नाहीत. ह्यांचं डोकं फिरलयं असं म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. तर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची होळी करुन निषेध नोंदवला आहे.
'जगाच्या अंतापर्यंत दुसरे शिवाजी महाराज होणे नाही, ह्यांचं डोकं फिरलयं' - नरेंद्र मोदी यांच्यावर लिहण्यात आलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन
दिल्लीत एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहण्यात आलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचे नाव आहे. यावरुन भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची होळी करुन निषेध नोंदवला आहे.
सीएए, एनआरसी कायद्यावरून देशभरात भाजप सरकारविरोधात टीका केली जात आहे. अशातच आता दिल्लीत प्रकाशीत करण्यात आलेल्या पुस्तकावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे.
जय भगवान गोयल नावाच्या भाजप नेत्याने हे पुस्तक लिहिले असून, त्यांनी ट्विट करून पुस्तकप्रकाशीत केल्याची माहिती दिली. दिल्लीच्या भाजप कार्यालयात शनिवारी 'धार्मिक सांस्कृतिक संमेलन' आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.