महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचा गेल्या ५ वर्षापासून अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड - jitendra awhad critisim on bjp

भाजप सरकारने घुसमट केल्यानेच अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. अजित पवार हे  मुख्यमंत्री पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचेही आव्हाड म्हणाले. गेल्या ५ वर्षापासून हे सरकार अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड

By

Published : Sep 28, 2019, 2:17 PM IST

Updated : Sep 28, 2019, 3:38 PM IST


मुंबई - भाजप सरकारने घुसमट केल्यानेच अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. अजित पवार हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचेही आव्हाड म्हणाले. गेल्या ५ वर्षापासून हे सरकार अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आव्हाड म्हणाले.

भाजपचा गेल्या ५ वर्षापासून अजित पवारांना संपवण्याचा प्रयत्न - जितेंद्र आव्हाड

हेही वाचा - शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, सर्व जागांवर लढण्याची तयारी -उद्धव ठाकरे

हेही वाचा - रविकांत तुपकरांचा रयत क्रांती सेनेत प्रवेश: सदाभाऊंनी केले स्वागत


अजित पवार हे कुटुंबवत्सल
जी चर्चा सुरु आहे त्यावर अजिबात जाऊ नका. मी अजित पवारांना अतिशय जवळून ओळखतो. ते अतिशय कुटूंब वत्सल असल्याचे आव्हाड म्हणाले. कुटुंबाबद्दल त्यांना नितांत आदर आहे. त्यांच्या देहबोलीवर आणि आवाजावर जाऊ नका ते खुप हळवे आणि प्रेमळ असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. काल प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ज्या ज्या पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला त्या सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्ते नेते यांचे जितेंद्र आव्हाड यांनी आभारही मानले.

Last Updated : Sep 28, 2019, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details