मुंबई - राज्याच्या मंत्री मंडळाचे खाते वाटप रविवारी जाहीर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. यापुर्वी हे खाते प्रकाश मेहता यांच्याकडे होते. गृहनिर्माण खाते मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत.
एकेकाळी चाळीमध्ये राहणारा माणूस करणार चाळीचा विकास! - जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खाते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. यापुर्वी हे खाते प्रकाश मेहता यांच्याकडे होते. गृहनिर्माण खाते मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत.
![एकेकाळी चाळीमध्ये राहणारा माणूस करणार चाळीचा विकास! जितेंद्र आव्हाड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5599701-thumbnail-3x2-jit2.jpg)
जितेंद्र आव्हाड
ट्विट मध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या घराचा पत्ता दिला आहे. त्यावेळी ते मुंबईतील श्रीपत भवन चाळीत राहत होते. जो माणूस चाळीमध्ये राहायचा तो आता चाळीचा विकास करणारा गृहनिर्माण मंत्री झाला, असे लिहले आहे.
हेही वाचा - अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर !
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून आव्हाड निवडून आले आहेत. 2014 पुर्वीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी वैद्यकिय शिक्षण आणि फलोत्पादन खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे.