मुंबई -'आरे' काँलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या वृक्षतोडीची माहिती समजताच पर्यावरणप्रेमींनी कारशेडबाहेर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे पोलिसांचाही येथे बंदोबस्त तैनात आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही याबाबत संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक व्हिडिओ शेअर करुन सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? असा संतत्प सवाल उपस्थित केला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर जितेंद्र आव्हाड यानी 'सेव्ह आरे', '#AareyForest' हे टॅग देऊन हा व्हिडिओ शेअर केला आहे. वृक्षतोडीविरोधात बोलणारे राजकिय व्यक्ती आता कुठे गेले, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली. ही झाडं कापून मुंबईच्या प्रदुषणात वाढ तर होणारच आहे. मात्र, यासोबतच आपल्या पिढीसोबतच येणाऱ्या पीढीसाठीही हे घातक आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा -मेट्रो कारशेडसाठी रात्रीच्या अंधारात ३०० झाडांवर कुऱ्हाड.. पर्यावरणप्रेमींचा संताप