मुंबई -एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही वारिस पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मी सच्चा भारतीय असून, माझी संविधानावर निष्ठा आहे. वारिस पठाण यांनी केलेल्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वारिस पठाणांच्या चिथावणीखोर भाषणाला आम्ही 'असे' देणार उत्तर.. एक सच्चा भारतीय - एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण न्यूज
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेकजण टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही पठाण यांच्यावर निशाणा साधला आहे.वारिस पठाण यांनी केलेल्या भडकाऊ भाषणाला 'आम्ही भारताचे लोक' राज्यघटनेने उत्तर देणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचा वारिस पठाण यांच्यावर निशाणा
काय म्हणाले होते वारिस पठाण
वारिस पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.