महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर वैयक्तिक टीका करणे मोदींना शोभत नाही - जितेंद्र आव्हाड - tweet

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका प्रचारसभे दरम्यान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घटाळ्यावरू टीका केली होती. त्या टिकेला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड

By

Published : May 5, 2019, 3:14 PM IST

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती सतावत असल्याने त्यांचा तोल सुटत चालला आहे, यामुळेच त्यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांना अशा प्रकारची टीका करणे शोभत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी एक ट्विट करून आपली भावना व्यक्त करत मोदींवर निशाणा साधला आहे.

आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की "मोदींनी दिवंगत राजीव गांधींवर केलेल्या व्यक्तिगत खालच्या पातळीच्या टीकेचा निषेध करतो. ज्यांचा देह छिन्नविच्छिन्न अवस्थेत जगाने बघितला. आपल्या आईप्रमाणे त्यांनीही देशासाठी बलिदान दिले, त्यांच्यावर आज म्हणजे मरणानंतर 28 वर्षांनी व्यक्तीगत टीका कारणे, हे मोदींना शोभत नाही"

आव्हाड यांनी केलेल्या या ट्विटवर मोदीं विरोधात अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर मोदी यांना आता आपला पराभव दिसत असल्याने ते कोणावरही खासगी टीका करत असल्याचे आव्हाड यांच्या ट्विटवरील प्रतिक्रियेत अनेकांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details