महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jitendra Avhad On Up election 2022 : "... तर भाजपाला पूर्ण मातीत घाला," जितेंद्र आव्हाड यांची टिका - उत्तरप्रदेश विधानसभा जितेंद्र आव्हाड

आगामी उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी जाणार ( Up election 2022 ) आहे. भाजप हरले पाहिजे हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये नागरिकांना सांगा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad criticized bjp ) केले आहे.

jitendra avhad
jitendra avhad

By

Published : Jan 31, 2022, 8:28 AM IST

ठाणे - ठाण्यातील मुंब्रा येथील अमृत नगर परिसरातील विविध विकास कामांचे लोकर्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. आगामी उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत ( Up election 2022 ) प्रचार करण्यासाठी जाणार आहे. भाजप हरले पाहिजे हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये नागरिकांना सांगा, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले ( Jitendra Avhad criticized bjp ) आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणार

जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, मी तुमच्याकडे काही गोष्ट सांगू इच्छितो की उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक होत ( Jitendra Avhad On Up election 2022 ) आहे. त्यावर पुढील रणनीती होणार आहे. देशात काय होणार? काही नाही? हे उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर अवलंबून आहे. यावेळी आव्हाड यांनी कोणाला मतदान करायचे हे मी सांगणार नाही, असे सांगत भाजपा हरले पाहिजे हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जाऊन लोकांना सांगा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

मी स्वतः उत्तर प्रदेश मध्ये जाणार आहे

माझ्या जवळचे उमेदवार बुलंद शहर मध्ये उभे असून, मी तिथे जाणार आहे. काही जण भाजपाची सुपारी घेऊन उत्तर प्रदेश मध्ये उभे आहेत. त्यांच्यापासून सावध रहा स्वतःची अक्कल लावा मतदान कोणाला दिले पाहिजे हे तुम्ही ठरवा. नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार? ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणार आहे.
ही निवडणूक सांगणार आहे 2024 मध्ये दिल्ली मध्ये कोण सत्तेत बसणार. त्यामुळे या निवडणुकीला गंभीरपणे घेण्याचा सल्ला आपल्या भाषणातून आव्हाड यांनी दिला.

भाजपाला मातीत घाला

पुढे बोलताना आव्हाड यांनी म्हटलं की, तुम्ही विचार करून चला जे तुम्ही ठरवणार ते पुढील भविष्य असणार आहे. भविष्य बिघडनार असेल तर तुम्ही भाजपाला पूर्ण मातीत घालून संपून टाका. माझे भाषण संपताच पूर्ण उत्तर प्रदेशात माझे भाषण व्हॉटसअप वर पाठवून टाका, असा सल्लाही यावेळी आव्हाड यांनी दिला.

हेही वाचा -Nana Patole On Gandhi Killing : नाना पटोले म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा 'वध' केला

ABOUT THE AUTHOR

...view details