मुंबई -'सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं,' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांचे माझे सहकारी सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. ही घटना वाईट असल्याचे आव्हाड म्हणाले.
'ज्या सचिन अहिरांना शरद पवार यांनी लहानपणासून आधार दिला, विविध पदे दिली. सचिन अहिर आले आणि साहेबांनी कधी दरवाजा उघडला नाही, असे गेल्या २० वर्षात कधीच घडले नसल्याचे आव्हाड म्हणाले. तुमच्या हृदयात शरद पवार आहेत तर मग असं केल्याने त्यांच्या हृदयाचे काय तुकडे होत असतील याचा सचिन अहिर यांनी विचार केला का,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.