मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली, स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली, ज्यांनी विचारांचे विष पेरले त्यांचा काय इतिहास शिवकवणार, असे म्हणत आव्हाड यांनी आरएसएसवर टीकास्त्र सोडले आहे.
ज्यांनी विचारांचे विष पेरले त्यांचा काय इतिहास शिकवणार, जितेंद्र आव्हाडांचा आरएसएसवर निशाणा - british
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांनी ब्रिटिशांना साथ दिली, स्वातंत्र्य लढ्यात गद्दारी केली, ज्यांनी विचारांचे विष पेरले त्यांचा काय इतिहास शिवकवणार, असे म्हणत आव्हाड यांनी आरएसएसवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचा आरएसएसवर निशाणा
नागपूर विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका' शिकवली जाणार आहे. याच मुद्यावरून आव्हाड यांनी आरएसएसला लक्ष केले. ज्यांनी विचारांचे विष पेरले आणि त्यामुळे महात्मा गांधांची हत्या झाली, त्यांचा काय इतिहास लिहिणार आणि शिकवणार, असे म्हणत त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला.