मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वक्तव्य भारतीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. मोदींनी राजीव गांधीबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती.
ज्या राजीव गांधीनी प्रगतशील भारताची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजीव गांधीमुळे भारताची तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. माणूस मरण पावल्यानंतर त्याच्याशी असणारे वैर संपते असे हिंदू धर्मात शिकवले जाते. हिंदूत्वाचा प्रचार करतो, हिंदुत्वार मतदान मागीतले त्याच हिंदु धर्माचा अपमान केल्याचे आव्हाड म्हणाले.