मुंबई:मुंबईत इंटरनेट ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा वेळेस इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर जिओ फायबरनेटने अत्यंत माफक दरात इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केल्याने अनेक ग्राहकांनी इंटरनेट कनेक्शन कडून आता जिओ फायबर नेटकडे आपला मोर्चा वळवला आहे.
जिओ फायबर नेट सेवेला कट:जिओ फायबर नेट या कंपनीकडून अत्यंत स्वस्त दरात चांगले पॅकेज देण्याचा प्रयत्न असल्याने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या हादरून गेल्या आहेत. त्यामुळे जिओ फायबर नेटच्या तारा खंडित करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून बोरिवली परिसरातील जिओ फायबरचा इंटरनेट सेवा खंडित करण्यात येत आहेत. बोरिवली परिसरातील हिना इलिगन्स पॉवर आणि साईबाबा नगर परिसरात जिओ फायबरच्या इंटरनेट केबल चेंबरमध्ये उतरून कापण्यात आली. तर बोरिवली पश्चिम येथील आय सी कॉलनी क्रॉस रोड या परिसरातही जिओ फायबरच्या केबल कापण्यात आल्या आहेत. जिओ फायबरच्या केबल कापल्या जात असल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.