महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jio Air Fiber on Ganesh Chaturthi : 'जिओ एअर फायबर'चं गणेश चतुर्थीला लाँचिंग - मुकेश अंबानींची घोषणा - जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म

जिओ एअर फायबरचं गणेश चतुर्थीला लाँचिंग होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी याची घोषणा केली. याद्वारे 20 कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची योजना असल्याचं ते म्हणाले. दररोज 1.5 लाख कनेक्शन जोडता येतील अशीही माहिती त्यांनी दिली. तसंच आकाश अंबानींनी 'जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म' आणि 'जिओ ट्रू 5G लॅब' लॉन्च करण्याचीही घोषणा केली. वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.

मुकेश अंबानींची घोषणा
मुकेश अंबानींची घोषणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 4:11 PM IST

मुंबई - जिओच्या एअर फायबरची प्रतीक्षा आता संपली आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला ही एअर फायबर जिओ लॉन्च करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याची घोषणा केली. जिओ एअर फायबर 5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घरे आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणार आहे. जिओ एअर फायबरच्या लॉंचिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जिओची ऑप्टिकल फायबर पायाभूत सुविधा 15 लाख किलोमीटरमध्ये पसरलेली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी म्हणाले की, 'आमच्या ऑप्टिकल फायबर सेवेशी, जिओ फायबरशी 10 दशलक्षाहून अधिक परिसर जोडलेले आहेत. तरीही लाखो परिसर असे आहेत जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणं कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण दूर करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरं आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करत आहोत. जिओ एअर फायबर सादर केल्यामुळे, जिओ दररोज 1.5 लाख नवीन ग्राहक जोडू शकेल.

जिओचे ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर संपूर्ण भारतात 15 लाख किमी पसरलेलं आहे. सरासरी, ऑप्टिकल फायबरचा ग्राहक दरमहा 280 GB पेक्षा जास्त डेटा वापरतो, जो जिओच्या दरडोई मोबाईल डेटा वापराच्या 10 पट आहे.

जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म -वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिओ एअर फायबर तसंच जिओ ट्रू 5G डेव्हलपर प्लॅटफॉर्म आणि जिओ ट्रू 5G लॅब लॉन्च करण्याची घोषणा केली. जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, 'आम्ही एक व्यासपीठ तयार करत आहोत जे भारतीय उद्योग, छोटे व्यवसाय आणि तंत्रज्ञान स्टार्ट-अप्सच्या डिजिटल जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतील. एंटरप्राइझच्या गरजा लक्षात घेऊन, जिओ ने 5G नेटवर्क, एज कंप्युटिंग आणि ऍप्लिकेशन्स एकत्र करून एक सर्वसमावेशक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. दुसरीकडे, 'जिओ ट्रू 5G लॅब' मधील आमचे तंत्रज्ञान भागीदार उद्योग-विशिष्ट समाधाने विकसित, चाचणी आणि सह-निर्मित करू शकतात. जिओ ट्रू 5G लॅब रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, नवी मुंबई येथे असेल.

हेही वाचा...

  1. Digital Data Protection Bill : तुमचा डेटा झाला आता सुरक्षित, डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल राज्यसभेतही मंजूर
  2. Recovery Of Lost Mobile : हरवलेले मोबाईल रिकव्हर करण्यात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक
  3. ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details