महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झारखंडमधील मजूरची मुंबईत हत्या: घटना सीसीटीव्हीत कैद - mumbai crime news

आरोपी बरकत शेख हा सुद्धा साहिबगंज जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे अमानत दियार सुद्धा ह्याच जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहे. अमानत दीयारा सोबत युसूफ शेख हा सुमारे पाच महिन्यांपूर्वी मुंबईत मासेमारीच्या व्यवसायासाठी आला होता.

झारखंडमधील मजूरची मुंबईत हत्या
झारखंडमधील मजूरची मुंबईत हत्या

By

Published : Feb 28, 2021, 4:46 PM IST

मुंबई- झारखंड राज्यातील साहिबगंज जिल्ह्यातील उधवा येथील अमानत दियार या मजूराची मुंबईच्या कोलाबाग परिसरात हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बरकत शेख असे त्या आरोपीचे नाव आहे. मात्र, अद्याप हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात
आरोपी बरकत शेख हा सुद्धा साहिबगंज जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे अमानत दियार सुद्धा ह्याच जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहे. अमानत दीयारा सोबत युसूफ शेख हा सुमारे पाच महिन्यांपूर्वी मुंबईत मासेमारीच्या व्यवसायासाठी आला होता. परंतु दुर्दैवाने अमनत दियराचा मृतदेह गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबईतील कोलाबाग पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या फिश मार्केटमध्ये सापडला. या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबईत राहणारे अमानतचे कुटुंब जेजे रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणी कोलाबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शवविच्छेदनानंतर युसूफचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details