महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: दुचाकी चालकाच्या डिक्कीत सापडले दागिने आणि रोख रक्कम; वाहनचालकास अटक - दुचाकीच्या डिक्कीत दागिने आणि रोख रक्कम सापडले

आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या अटल गुन्हेगारास नाकाबंदी कारवाई दरम्यान वरळी पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. अटक आरोपीचे नाव मोहम्मद आफताब कासिम खान उर्फ मौस इन इमरान सय्यद उर्फ शेख (वय 22 वर्षे) आहे. अटकेतील आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली.

Mumbai Crime
आरोपीस अटक

By

Published : Feb 11, 2023, 7:42 PM IST

मुंबई: 9 फेब्रुवारीला वरळी पोलीस ठाण्याचे रात्रपाळी पोलीस निरीक्षक दोरकर यांना जिजामाता नगर येथे वाहन चालक शेख हा वाहन चालवताना वाहतुकीचे उल्लंघन करताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक दोरकर पोलीस शिपाई गवळी, पोलीस हवालदार पाटणे, पोलीस हवालदार फडतरे यांचे पथक घटनास्थळी कारवाई करत होते. यावेळी रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी एक इसम त्यांच्या ताब्यात असणारी एक्टिवा मोटर स्कूटर नंबर प्लेटविना चालविताना आढळून आला.

तपासणीस आढळले घबाड : वाहनचालक पोलिसांना बघून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाला संशय निर्माण झाला. त्याला अडवून वाहन चालकाचा परवाना आणि इतर कागदपत्रे याबाबत विचारणा केली असता त्याने वाहन परवाना काढला नसल्याचे निष्पन्न झाले. या इसमास वाहनास नंबर प्लेट का नाही तसेच हेल्मेट का घातले नाही याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी त्याला पकडून वरळी पोलीस ठाण्यात आणले आणि त्याची सखोल चौकशी केली. पोलिसांनी मोटरसायकलची तपासणी केली असता त्याच्याकडे अनेक सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आली. हे पाहून पोलीस अवाक् झाले आणि त्यांनी अधिक चौकशी सुरू केली.


आरोपी हा आंतरराज्यीय गुन्हेगार: आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलमधील कॉल लॉग तपासले असता त्याला सतत मिस कॉल येत असल्याचे समजले. चौकशीत हा मोबाईल अजमेर, राजस्थान येथून चोरीस गेलेला आहे, अशी माहिती प्राप्त झाली. त्याचप्रमाणे ताब्यातील व्यक्तीची सखोल चौकशी केली असता त्याने वरळीसह इतर ठिकाणीही चोरी केल्याचे सांगितले. फिर्यादीप्रमाणे वरळी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 379 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलीस निरीक्षक दोरकर करत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी हा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

चोरीचा लावला छडा: सोलापूर शहर हद्दीत मोठी घरफोडीची घटना 6 फेब्रुवारी, 2023 रोजी घडली होती. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत आशिष पद्माकर पाटोदेकर (वय 30 वर्ष, रा. दक्षिण कसबा, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. जवळपास 61 लाखांचा मुद्देमाल, रोख रक्कम चोरीला गेली होती. मोठी चोरी असल्याने शहर पोलीस दलातील क्राईम ब्रँचने या चोरीचा तपास आपल्या हाती घेतला व या चोरीचा छडा लावला.

आरोपी ड्रायव्हरला अटक: सोलापूर शहरातील चोरी झालेल्या घरात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यास अटक करून त्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला. शहर पोलीस दलातील क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कसोशीने या चोरीचा तपास करून, ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या उमाकांत उर्फ उमेश बाबू यादव (वय. 30 वर्षे, रा. सुलेरजवळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यास अटक केली. घरी काम करीत असलेल्या ड्रायव्हरवर आशिष पाटोदेकर व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी मोठा विश्वास केला होता. उमाकांत उर्फ उमेश याने विश्वासघात करीत 45 लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल बनावट चावीने लंपास केला होता.

हेही वाचा :Narayan Rane criticized Aditya Thackeray In Pune: आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका, मला उपवास करावा लागेल - नारायण राणेंचा पुण्यात टोला

ABOUT THE AUTHOR

...view details