महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jespa Lion Dies : संजय गांधी नॅशनल पार्कमधील जेस्पा सिंहाचा अखेर मृत्यू - Sanjay Gandhi National Park Mumbai

महिनाभरांपासून आजारी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park Mumbai ) ११ वर्षांच्या जेस्पा नावाच्या एकमेव सिंहाचा रविवारी अखेर मृत्यू (Jespa Lion dies) झाला. रविंद्र या १७ वर्षांच्या सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर उद्यानात जेप्सा हा एकच नर सिंह शिल्लक होता.व Latest news from Mumbai

Jespa Lion dies
जेस्पा सिंहाचा अखेर मृत्यू

By

Published : Nov 29, 2022, 4:32 PM IST

मुंबई : गेल्या महिनाभरांपासून आजारी असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park Mumbai ) ११ वर्षांच्या जेस्पा नावाच्या सिंहाचा रविवारी अखेर मृत्यू (Jespa Lion dies) झाला. तो प्राणी संग्रहालयात एकमेव असा सिंह होता. त्यांचा जन्म उद्यानातच २२ सप्टेंबर २०११ साली झाला होता. त्याला क्रोनिक ऑस्टियो संधिवाताने (Leo has chronic osteo arthritis) ग्रस्त होते. यामुळे गेल्या महिनाभरांपासून त्याला उठताही येत नव्हते. Latest news from Mumbai

जेस्पा सिंहाचे अंतर्गत अवयव निकामी :त्या जन्म प्राणी संग्रहालयात २२ सप्टेंबर २०११ रोजी शोभा आणि रवींद्र नावाच्या सिंहापासून झाला होता. जेस्पा हा गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याला प्रदर्शन करिता सोडण्यात येत नव्हते. त्याचेवर पशू वैदयकांचे तांत्रिक समितीचे मार्गदर्शनात उपचार सुरू होते. परंतु त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. त्याचे मृतदेहाचे शव विच्छेदन मुंबई पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ञ डॉ. गाढवे यांनी केले. प्राथमिक अहवालानुसार अंतर्गत अवयवांचे निकामी होणे आणि अशक्तपणा यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉ. गाढावे यांनी वर्तविली आहे. शवविच्छेदनानंतर त्याला श्रद्धांजली वाहून मृतदेहाचे दहन करण्यात आले.

जेप्साला क्रोनिक ऑस्टियो संधिवाताने ग्रासले :ऑक्टोंबर २०२२ रोजी रविंद्र या १७ वर्षांच्या सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर उद्यानात एकच नर सिंह शिल्लक होता. त्यामुळे उद्यानात ११ वर्षांचा जेस्पा नावाचा सिंह जिवंत होता. मात्र तोही वृध्दापकाळाने आजारी होता. त्याला गंभीर क्रोनिक ऑस्टियो संधिवाताने ग्रासले होते. त्यामुळे गेल्या महिनाभरांपासून तो एकाच जागेवर बसून होता.

ABOUT THE AUTHOR

...view details