मुंबई Mumbai Gaurav Award 2023 : २०१७ पासून सुरु झालेल्या ‘मुंबै महोत्सवा’चं हे सातवं वर्ष आहे. मुंबईच्या नावलौकिकात भर टाकणार्या व्यक्ती, समाजाला स्फूर्तीदायी असे वेगळे काम करणार्या व्यक्ती यांना या महोत्सवामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतात. १६ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘मुंबै गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. तर ‘मुंबै भूषण’, जीवनाधार जीवनगौरव पुरस्कार, मुलखावेगळी माणसं आणि सामाजिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग, नाटक, चित्रपट, मालिका, साहित्य, शिल्प, चित्र, पत्रकारिता, संगीत, विज्ञान, राजकारण, अध्यात्म अशा क्षेत्रांचा यामध्ये सामावेश आहे.
आजवर 'या' मान्यवरांना पुरस्कार प्रदान: डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ऋतुजा बागवे, पत्रकार सचिन परब, पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, जाहिरात गुरू भरत दाभोळकर, अभिनेते अरुण नलावडे, डॉ. शैलेश नाडकर्णी, वृत्तनिवेदक मंदार फणसे, अलका कुबल, सयाजी शिंदे, महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेत्री आयेशा झुल्का, प्रख्यात कायदेतज्ज्ञ ऍड. उज्वल निकम, ज्येष्ठ दिग्दर्शक व संकलक विवेक देशपांडे, कुहू भोसले आदींसह अनेक मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.