मुंबई : राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्तेत प्रवेश केल्याने, राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातसुद्धा याचे पडसाद बघायला मिळत आहेत.
काय आहे प्रकरण: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व सुशोभीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे सांगत, याबाबत शेकाप आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आत्तापर्यंत या जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी जेवढा पैसा खर्च करण्यात आला, त्या पैशात तीन इमारती बांधून झाल्या आहेत. दरवर्षी या इमारतीवर अमाप पैसा खर्च केला जातो असे सांगितले. यावर भाजप आमदार भाई गिरकर यांनी मग इतकी वर्ष तुम्ही काय केले? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारत टोला लगावला. त्यावर जयंत पाटील संतप्त झाले. आमच्यासारखे वेडे लोक राजकारणात आहेत, चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत मला अनेक ऑफर दिल्या असे सांगत, राज्यात फोडाफोडीचे राजकारण कसे चालू आहे हे सांगितले आहे.
का संतप्त झाले जयंत पाटील: जयंत पाटील यांचा अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या गैव्यवहारप्रकरणी प्रश्न होता. पण या प्रश्नावर त्यांना अनेक वर्ष तेच-तेच उत्तर देण्यात आले. आतापर्यंत त्यांनी ११ वेळा हा प्रश्न उपस्थित केला आहे. पण दरवेळी त्यांना तेच उत्तर देण्यात येते. यापूर्वी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा या प्रश्नावर उत्तर दिले असूनही हा प्रश्न मार्गी लागला नसल्याने, आताही तेच उत्तर दिले जात आहे. अशा प्रसंगी मी केवळ सत्तेत नाही म्हणून हा प्रश्न मार्गी लागत नाही का? असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
नवीन इमारतीसाठी १२ कोटी : या प्रश्नावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी, ही इमारत सन १९८०-८१ साली बांधण्यात आली असे सांगितले. मागील १२ वर्षात या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १० कोटी ६५ लाख रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी बजेटमध्ये नवीन इमारतीसाठी १२ कोटी रुपये देण्यात येतील असेही सांगण्यात आले.
हेही वाचा -
- NCP political crisis: राष्ट्रवादीत होत आहे ड्रामा, पहा स्पेशल रिपोर्ट
- Maharashtra Monsoon Session 2023: नीलम गोऱ्हेंना सुनावणी होईपर्यंत उपसभापती पदावर बसण्याचा पूर्ण अधिकार-देवेंद्र फडणवीस
- NCP MLAs Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'हे' आहे भेटीमागचे कारण