मुंबई:जयंत पाटील म्हणाले की, आज आम्ही राज्यपालांच्या भेटीला राजभवन येथे गेलो होतो. दरम्यान, वाय बी सेंटरला यायचं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत, असे कळविण्यात आले. जयंत पाटील तेथे पोहोचले असता अजित पवार आमदारांसह शरद पवारच्या भेटीला आलेले आढळले. त्यांनी पवार यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्षे ज्यांनी काम केले आहे त्यांचे हे कुटुंब आहे. त्यातील काहींनी वेगळी कृती केली आहे. यातून मार्ग काढावा, अशी विनंती अजित पवारांनी केली, असे जयंत पाटलांनी सांगितले.
भेटायला येणाऱ्याला पवार भेटतात:शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्वांना भेटत असतात. त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेवरती शंका येण्याचे कारण नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. राजकारणात संवाद कधीच बंद करायचा नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष आहे. शरद पवारांनी येवल्यातील सभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आमदार नाराज आहेत की, नाही हे तुम्ही आमदारांना विचारा. आमच्यातील काही विरोधी पक्षाच्या बाजूला बसले आहेत. संवादातून चांगल्या काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे संवाद चालू ठेऊन हे योग्य असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.