महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayant Patil Met Uddhav Thackeray : जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; भेटीमागचे सांगितले 'हे' कारण - Jayant Patil Met Uddhav Thackeray

सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. 'इंडिया'ची मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीबाबत आमच्यात चर्चा झाल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.

Mumbai News
जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By

Published : Aug 7, 2023, 9:56 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. या सर्व चर्चांमध्ये जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली आहे. मुंबईतील विरोधकांच्या तिसऱ्या बैठकीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी भेटीनंतर दिली आहे.

जयंत पाटील मातोश्रीवर :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्यातले राजकारण ढवळून निघाले होते. जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. त्यातच सोमवारी जयंत पाटील थेट 'मातोश्री'वर दाखल झाले. तब्बल एक तासभर जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

भेटीमागचे 'हे' आहे कारण -जयंत पाटील यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आजची भेट ही सदिच्छा भेट होती. तसेच मुंबई येथे 'इंडिया'ची बैठक होणार आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर आमच्यात चर्चा झाली. केंद्रातील भाजपा विरोधातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडी तयार केली आहे. 'इंडिया'ची तिसरी बैठक मुंबई येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरला पार पडणार आहे. बैठकीचे यजमानपद ठाकरे गटाकडे असून, बैठकीचे आयोजन महाविकास आघाडी करणार आहे. त्यासाठी पंधरा सदस्य समिती तयार करण्यात आली. त्याबाबतच ही बैठक असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही : जयंत पाटील हे अजित पवार गटासोबत जाणार असल्याचे बोलले जात होते. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, अशी कोणतीही भेट झाली नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली नसल्याचे म्हणत सर्व बातम्या खोट्या असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. तसेच जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचेही स्पष्टीकऱण स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

हेही वाचा -

  1. Prasad Lad on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाड यांची जहरी टीका; Watch Video
  2. Uddhav Thackeray News : देवेंद्र फडणवीस हे मास्टर मंत्री, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्ही घरी...चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवा
  3. Devendra Fadnavis : जयंत पाटील यांची अमित शाहांसोबत भेट....; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details