महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्व उपनगरात दोन नवे कोविड सेंटर; जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण - covid Center at Godrej Community Center

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आरोग्य व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. पूर्व उपनगरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गोदरेज कम्युनिटी सेंटरचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. तसेच, घाटकोपर पूर्व येथील म्हाडा समाज मंदिर हॉलमध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू करण्यात आले आहे.

Oxygen Center at Mhada Samaj Mandir Hall
कोविड सेंटर गोदरेज कम्युनिटी सेंटरचे

By

Published : Apr 28, 2021, 4:27 AM IST

मुंबई -मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आरोग्य व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. पूर्व उपनगरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता आता विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गोदरेज कम्युनिटी सेंटरचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. तसेच, घाटकोपर पूर्व येथील म्हाडा समाज मंदिर हॉलमध्ये ऑक्सिजन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही सेंटरचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा -मुंबईत कोरोनाचे 4014 नवे रुग्ण, 59 रुग्णांचा मृत्यू

पूर्व उपनगरात दोन नवे सेंटर

गोदरेज कम्युनिटी हॉलमधील रुग्णालयात २५ आयसीयू व ७५ ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. या ठिकाणी सौम्य लक्षणांसह आजार बळावलेल्या रुग्णांवरही तातडीने उपचार करता येतील. तर, म्हाडा समाज मंदिर हॉलमधील ऑक्सिजन केंद्रात ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे. हे रुग्णालय आणि ऑक्सिजन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. कालपासून हे रुग्णालय आणि हे ऑक्सिजन केंद्र सुरू करण्यात आले.

लाॅकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील

पूर्व उपनगर भागात मोठी लोकसंख्या आहे आणि याचा सर्व भार हा राजावाडी रुग्णालयावरती पडतो. मात्र, या दोन केंद्रांमध्ये चांगली व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे याचा मोठा फायदा होईल. देशाची जनता सुशिक्षित आहे. ही जनता आता सगळे पुढे आणत आहे. जर युपीचे मुख्यमंत्री म्हणत असतील की कोरोना कुठे आहे? तर हा मोठा धक्का आहे. युपीच्या नागरििकांवर मोठी आपत्ती असेल हे लक्षात घेतले पाहिजे. सध्या राज्यात आकडेवारी स्थिर होत आहे. मात्र, आम्ही समाधानी नाही, हा ताण कमी करण्यासाठी दोन ते तीन दिवसांत मंत्री मंडळाची बैठक होईल, त्यानंतर लाॅकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -शिवसेना खासदार शेवाळेंच्या 'त्या' मागणीला काँग्रेसचा विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details