महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील फार ज्ञानी मंत्री - जयंत पाटील - चंद्रकांत पाटील

अर्थसंकल्प आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते. विरोधक याबाबत अज्ञानी आहेत. त्यांनी याबाबतचे नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यालाच आज जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

जयंत पाटील आणि चंद्रकांत पाटील

By

Published : Jun 19, 2019, 1:48 PM IST

मुंबई -चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून विरोधकांवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील फार ज्ञानी माणूस असल्याची उपरोधीक टीका त्यांनी यावेळी केली.

चंद्रकांत पाटलांबाबत बोलताना जयंत पाटील

अतिरिक्त अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्पाचे ग्राफिक्स छायाचित्र पोस्ट केले जात होते. त्यामुळे हा अर्थसंकल्प आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले होते. विरोधक याबाबत अज्ञानी आहेत. त्यांनी याबाबतचे नवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यालाच आज जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील फार ज्ञानी मंत्री आहेत. भारताने अवकाश यान पाडले होते. त्यावेळी ते पाकिस्तान किंवा चीनचे यान पाडले असल्याचे ज्ञान त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडले होते. त्यामुळे कुठल्याही माहितीशिवाय बोलण्याची सवय चंद्रकांत पाटलांना असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details