महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे' - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर फडणवीस यांनी टीका केली होती.

Jayant Patil
जलसंपदा मंत्री जयंत पाटील

By

Published : Jan 7, 2020, 2:09 PM IST

Updated : Jan 7, 2020, 3:26 PM IST

मुंबई- सत्ता गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. फडणवीस कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मोघम आरोप करत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ट्विटरवर त्यांनी ही टीका केली आहे.

हेही वाचा -मुंबईकरांची तहान भागवणार 'गारगाई' प्रकल्प, पालिका करणार ३ हजार कोटी खर्च

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर फडणवीस यांनी टीका केली होती. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी 'फ्री काश्मीर' या आशयाचे पोस्टर्स फडकावले होते. स्वतंत्र भारतात अशा विभाजनवादी भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा -मुंबईकरांची तहान भागवणार 'गारगाई' प्रकल्प, पालिका करणार ३ हजार कोटी खर्च

यावर भाष्य करताना पाटील यांनी ट्विट करत, फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्या विद्यार्थ्यांनी काश्मीर बाबत जे पोस्टर्स फडकावले ते, स्वतंत्र काश्मीरसाठी नाहीत. तर सध्या काश्मीरमध्ये जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जी गळचेपी चालली आहे, त्या विरोधात हे पोस्टर्स होते. तिथल्या जनतेला अजूनही वेठीस धरले जात आहे, याबाबत ही पोस्टर्स असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Last Updated : Jan 7, 2020, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details