मुंबई - अलमट्टी धरणाचे पाणी वेळेवर सोडले असते तर सांगली-कोल्हापूर पाण्याखाली गेलेच नसते असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सरकारच्या चुकीमुळे पूर आला असल्याचेही पाटील म्हणाले. तसेच पूरग्रस्त भागात सरकारची मदत वेळेवर पोहचली नसल्याचेही पाटील म्हणाले. कठीण प्रसंगी माझे सहकारी व मी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या चुकीमुळेच पूर, जयंत पाटलांचा आरोप
अलमट्टी धरणाचे पाणी वेळेवर सोडले असते तर सांगली-कोल्हापूर पाण्याखाली गेलेच नसते असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सरकारच्या चुकीमुळे पूर आला असल्याचेही पाटील म्हणाले.
माणसं बाहेर काढायला सरकारनं उशीर केला
सरकार पूरग्रस्त ठिकाणी उशीरा आले. जवळपास ८० टक्के माणसे एकमेकाला सहाय्य करुन बाहेर आली. शेवटी शेवटी सरकारी मदत पोहचली असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही यामध्ये कधीच राजकारण केले नाही. जिथे मदत देता येईल तिथे आम्ही मतद केली. माझ्या घरातलीच ही माणसे असल्याचे पाटील म्हणाले.
ईडीच्या दबावाखाली भाजप-सेनेत प्रवेश सुरु
ईडीच्या दबावाखाली सध्या भाजपा-शिवसेनेत पक्षप्रवेश सुरु आहेत. ईडीला आपल्या हातातील हत्यार बनवून भाजप सरकार त्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. मागील ५ वर्षे हे सरकार झोपलं होतं का? असा सवालही पाटील यांनी केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानेच अनेकांची चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले.