महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता तर्राट झालोयाSS ; तुझ्या घरात आलोयाSS, जयंत पाटलांचा विखेंना गाण्यातून 'सैराट' टोला - bjp

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सैराट चित्रपटातील  'झालं झिंग झिंग झिंगाट' हे गाणे म्हणत भाजप - शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. आता तराट झालोया, तुझ्या घरात आलोया, असे म्हणत त्यांनी राधाकृष्ण विखेंनांही टोला लगावला.

जयंत पाटलांचा विखेंना टोला

By

Published : Jun 24, 2019, 10:47 PM IST

Updated : Jun 24, 2019, 11:41 PM IST

मुंबई - आता तर्राट झालोया, तुझ्या घरात आलोया, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. सैराट चित्रपटातील 'झालं झिंग झिंग झिंगाट' हे गाणे म्हणत त्यांनी भाजप - शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. डोक्यात गेलीया हवा, ही युतीची बाधा झाली असे म्हणत त्यांनी युतीवर टीका केली.

जयंत पाटलांचा विखेंना गाण्यातून 'सैराट' टोला

आता उतावीळ झालो, नेते फोडाया लागलो, असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजवर बोचरी टीका केली. तसेच जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्यादौऱ्यावरही जोरदार टीका केली. अयोध्येवरुन आलोया, लय दुरून आलोया, शेतकरी आंदोलन करतोया अन आम्ही मजा करतोया असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केले. समद्या राज्याला झालीया आपल्या युतची घाई, कधी होणार तू सेना आमच्या आमदारांची आई असे म्हणत सेना-भाजपवर निशाणा साधला.


आता तुझ्या घरात आलोया, विखेंना टोला

आता तराट झालोया, तुझ्या घरात आलोया, लय फिरुन बांधावरुन कलटी मारुनी आलोया असे म्हणत जयंत पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना टोला लगावला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

Last Updated : Jun 24, 2019, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details