मुंबई - सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन भाजप-शिवसेना युतीचा पराभव करु, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जे उमेदवारांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, अशाच उमेदवारांना संधी देणार असल्याचेही पाटील म्हणाले.
समविचारी पक्षांना एकत्र घेऊन युतीचा पराभव करु - जयंत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस
सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन भाजप-शिवसेना युतीचा पराभव करु असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच जे उमेदवारांमध्ये निवडूण येण्याची क्षमता आहे, अशाच उमेदवारांना संधी देणार असल्याचेही पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
वंचित आघाडीला एकत्र घेण्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मनसेला सोबत घेण्याबाबत आणखी कोणताही निर्णय झाला नाही. लवकरात लवकर जागावाटपाबाबतची चर्चा संपवणार आहोत. कोणत्याही परिस्थिती शिवसेना भाजपचा पराभव करायचा निर्धार आम्ही सर्व पक्षांनी केला आहे.