महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदींनी पाकिस्तानला दम भरल्यानेच अभिनंदन भारतात परतला - जावडेकर - वर्धमान अभिनंदन

मोदींनी पाकिस्तानला दम दिल्यानेच अभिनंदन एका दिवसात परतला... केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे मुंबईतील पत्रकार परिषदेत वक्तव्य.. मनमोहन सिंहानी पाकविरोधात मोदींसारखी कठोर भूमिका घेतली नसल्याचीही केली टीका

प्रकाश जावडेकर - केंद्रीय मंत्री

By

Published : Apr 22, 2019, 2:35 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दम भरल्यानेच पाकिस्तानच्या हद्दीत असलेला भारताचा पायलट अभिनंदन वर्धमान एक दिवसात परतला, त्यामुळे देश सुरक्षित हातात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. भाजप कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश जावडेकर - केंद्रीय मंत्री

युपीएच्या काळात माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी पाकिस्तान विरोधात कधीही कठोर भूमिका घेतली नाही. मात्र, मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्या भूमीत धडा शिकवला. सर्जिकल स्ट्राईक करण्याचे धाडस केवळ मोदीच दाखवू शकतात, असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. देशात मोदी यांच्या या भूमिकेला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, त्यामुळेच त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे जावडेकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या नावाने लोकसभा निवडणुकीत मत मागतली जात आहेत. असे असतानाचा आता भाजप नेत्यांकडूनही पायलट अभिनंदन वर्धमान यांच्या वापसीवर मत मागण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details