महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगना हाजीर हो!, जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या दाव्यानंतर जुहू पोलिसांनी बजावले समन्स

हृतिक रोशन प्रकरणात जावेद अख्तर यांनी माझ्यावर दबाब आणल्याचे आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केले होते. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कायदेशीर पद्धतीने तिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत

By

Published : Jan 21, 2021, 6:45 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मुंबईतील अंधेरी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात कंगनाला 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांनी बजावले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगनाने काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य करत हृतिक रोशन संदर्भात माझ्यावर जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.

काय आहे प्रकरण -

'एका वर्षापूर्वी जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. हृतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे आहेत, जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल,' अशा शब्दात जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कंगना रणौतने केला आहे.

कंगणाच्या बहिणीने सुद्धा केले होते आरोप -

जावेद अख्तर हे हृतिक रोशन संदर्भात काही गोष्टी सांगत असताना सतत माझ्यावर ओरडत होते. त्यामुळे मी फार घाबरले होते, असेही कंगनाने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

कंगना अगोदरही आहे वादात -

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती. या वादानंतर कंगनाने आपल्याला मुंबईत पुन्हा येऊ नको, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असे सांगितले होते. तसेच आपण 9 तारखेला मुंबईत येत असून कोणच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानही तीने दिले होते. यानंतर ती मुंबईत आली होती. यावेळी अनेक शिवसैनिकांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी करत मुंबई विमानतळावर गर्दी केली होती. दरम्यान, कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून तीचे अवैध कार्यालय देखील पाडले. आपले कार्यालय तोडल्यामुळे कंगनाने महाराष्ट्र मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली होती. अनेक दिवस अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत ट्विटरवाद वाद सुरू होता. तिने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही आपले मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details