मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी मुंबईतील राम स्वरूप दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. यासाठी अख्तरांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने अख्तरांची याचिका फेटाळली होती. आज मुलुंड न्यायला त्याबाबत सुनावणी होती. मात्र, जावेद अख्तर यांनी न्यायालयाच्या सुनावणीकडे पाठ फिरवली. 20 एप्रिल रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण? :सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभर आणि जगात तालिबान यांच्याबाबत माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सर्व पार्श्वभूमीवर देशांमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तालिबानी प्रवृत्तीचा असल्याचे जावेद अख्तर यांनी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. अख्तरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना त्यांनी तालिबानी संघटना प्रवृत्तीच्या लोकांसोबत केली होती. देशामध्ये सर्वत्र धर्मरक्षक दुडगुस घालतात आणि ते तालिबानी प्रवृत्तीचे आहे, असल्याचे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी मुंबईतील राम स्वरूप दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.