महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जम्मू-काश्मीरमधील शिवसेना नेत्यांचा जल्लोष; बाईक रॅली काढत वाटले लाडू - शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी

महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत आहे. त्याबद्दल जम्मूतील प्रेस क्‍लब परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी, शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बाईक रॅली काढत लाडू वाटण्यात आले. रघुनाथ बाजार परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप परेड परिसरात करण्यात आला.

sena
जम्मू-काश्मीरच्या शिवसेना नेत्यांचा जल्लोष

By

Published : Nov 27, 2019, 11:41 PM IST

मुंबई -महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत आहे. त्याबद्दल जम्मू-काश्‍मीरमधील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. जम्मूतील प्रेस क्‍लब परिसरात शिवसैनिकांनी जल्लोष केला.

जम्मू-काश्मीरच्या शिवसेना नेत्यांचा जल्लोष

यावेळी, शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली शहरातून बाईक रॅली काढत लाडू वाटण्यात आले. रघुनाथ बाजार येथून निघालेल्या या मिरवणुकीचा समारोप परेड परिसरात करण्यात आला. "भाजपने शिवसेनेची फसवणूक केली. मात्र, भाजपच्या अहंकाराला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. जम्मू-काश्‍मीरमधील शिवसैनिकांना यामुळे आनंद झाला आहे" असे मत साहनी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा -फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर शिवसैनिकांचा टरबूज फोडून जल्लोष

महाराष्ट्रातील शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सत्ता मिळवणे शक्‍य झाल्याचे सहानी यांनी म्हटले आहे. मिळालेल्या यशासाठी त्यांनी या नेत्यांचे आभारही मानले आहेत. यावेळी, मीनाक्षी छिब्बर, अश्‍विनी गुप्ता, विकास बख्शी, राकेश गुप्ता, संजीव कोहली यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते

ABOUT THE AUTHOR

...view details