मुंबई :दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी सकाळी महत्त्वाची सुनावणी झाली. अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सकाळी दिलासा दिला. सोमवारपर्यंत या संदर्भात कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश अंमलबजावणी संचलनालयाला दिले. त्यामुळे आता त्याबाबत जरी अनिल परब निर्धार असले, तरी त्या प्रकरणातील मंगळवारी अटक केलेले जयराम देशपांडे या शासकीय अधिकाऱ्याला आज सत्र न्यायालयाने 18 मार्च 2023 पर्यंत कोठडी सुनावलेली आहे.
कायद्याचे उल्लंघन करून बांधकाम :अंमलबजावणी संचालनालयाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम जी देशपांडे मुंबई यांच्यासमोर जयराम देशपांडे यांच्या कोठडीची मागणी करताना मुद्दे मांडले की, हे जे बेकायदा साई रिसॉर्ट बांधले गेलेले आहे, त्याबाबत तक्रार दाखल केली गेली होती. परंतु सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हे बांधकाम केले गेले आहे. याबाबत स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांना कोणती सूचना देखील दिली गेली नव्हती. त्यामुळे यामध्ये मोठा गंभीर गुन्हा झालेला आहे.
सीआर झेड कायद्याचे उल्लंघन : पुढे ईडीचे वकील यांनी दावा केला की, सर्कल ऑफिसर सुधीर परगुळेने बनावट रिपोर्ट तयार केला. तसेच 2018 मध्ये या संदर्भातले बांधकामाची परवानगी दिली गेली आहे, ही परवानगी देताना संबंधित अधिकारी जयराम देशपांडे यांनी नियमाचे उल्लंघन केलेले आहे. म्हणूनच चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी अंमलबजावणी संचलनालय यांना दिली गेली पाहिजे, असा जोरदार युक्तीवाद मांडला. सरकारी पक्षाच्या वकिलांनी ही देखील न्यायालयाच्या समोर मांडले की, त्यावेळचे नायब तहसीलदार शंकर कोरवी म्हणाले की, सीआर झेड कायद्याचे उल्लंघन होत आहे.