महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jaipur Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; आरपीएफ जवान चेतन सिंह चौधरीवर सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल - police constable Chetan Singh Choudhary

Jaipur Express Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलैला आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन कुमार सिंहनं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह 3 प्रवाशांची हत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणी आता पोलीस कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरीवर सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे.

Charge sheet filed against police constable Chetan Singh Choudhary in the Mumbai Jaipur Express firing case in Sessions Court
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन सिंह चौधरीवर सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 7:46 AM IST

मुंबई Jaipur Express Firing :मुंबई ते जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 31 जुलै 2023 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह यानं आपल्याच सहकाऱ्यांसह प्रवाश्यांवर गोळीबार करुन हत्या केली होती. दरम्यान, या प्रकरणी आता आरोपी चेतन सिंह यावर सत्र न्यायालयात तब्बल 1206 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.


नेमकं काय आहे प्रकरण :मुंबईहून जयपूरला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस नेहमीप्रमाणे 31 जुलै रोजी निघाली. परंतु अचानक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये आरपीएफचा जवान चेतन सिंह आला आणि त्यानं गोळीबार करायला सुरुवात केली. कर्तव्यावर असलेल्या आपल्याच सहकारी आणि इतर तीन प्रवासी यांच्यावर त्यानं गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी चेतन सिंह याला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदवला होता. आरोपी चेतन सिंहला बोरीवली न्यायालयानं सात ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. नंतर ती कोठडी वाढवण्यात आली. तसंच या घटनेनंतर त्या डब्यामध्ये जे प्रवासी उपस्थित होते. त्यांचे देखील जबाब नोंदवण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर चेतन सिंह विरोधात 1206 पेक्षा अधिक पानाचं आरोपपत्र पोलिसांनी बोरीवली न्यायालयात दाखल केलं होतं. ते आता बोरीवलीमधून मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलं गेलं आहे.


आरोप पत्रात काय :आरोप पत्रामध्ये प्रत्यक्ष घटनेचा सर्व घटनाक्रम तसंच त्या रेल्वेच्या डब्यामधील सीसीटीव्ही फुटेज संदर्भातील माहिती नमूद करण्यात आली. आरोपी चेतन सिंह चौधरी याला महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील तुरुंगातील कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आरोपीवर आयपीसी कलम 302 (हत्या करणे) तसंच कलम 153 (इतरांमध्ये शत्रुतता वाढवणं) त्याशिवाय (महाराष्ट्र शासकीय मालमत्ता नुकसान करणं) अशा विविध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात सत्र न्यायालयामध्ये 2 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे.

हेही वाचा -

  1. Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील घटना कशी घडली? जीआरपीने गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा केला उभा
  2. Mumbai News: 'हा' त्रास होत असल्याने, थांबा नसताना देखील चेतनला वलसाडला उतरायचे होते
  3. Jaipur Mumbai Train Firing: चेतन सिंहच्या साहित्यिक भाषेमुळे गोळीबाराचे कारण उलगडेना! ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत होणार चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details