महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जैन मुनींना ओळखपत्राविना मिळणार लस, शिवसेनेच्या मागणीला यश

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल यांना पत्र देऊन जैन मुनींना कोरोना लस घेण्यास येत असलेल्या अडचणीकडे लक्ष वेधत त्यांना ओळखपत्र नसले तरी लस घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती.

Mumbai corona vaccination news
मुंबई कोरोना लसीकरण

By

Published : May 3, 2021, 1:01 PM IST

Updated : May 3, 2021, 3:45 PM IST

मुंबई -कोरोनाचे संकट देशात पाय पसरताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. मात्र, जैन मुनी, सर्वधर्मीय साधुसंत ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि लसीकरणासाठी लागणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे लसीकरण कसे होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे कागदपत्रे नसले तरी त्यांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्त यांना केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल यांना पत्र देऊन जैन मुनींना कोरोना लस घेण्यास येत असलेल्या अडचणीकडे लक्ष वेधत त्यांना ओळखपत्र नसले तरी लस घेण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. पालिका आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे. शिवसेनेच्या या प्रयत्नांबद्दल जैन बांधवांकडून शिवसेनेचे आभार व्यक्त होत आहेत.

भाजपनेही केली होती मागणी

कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करताना पॅन कार्ड अथवा आधारकार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. मात्र, साधु हे सर्वत्र फिरत असतात व त्यांचा कायमचा पत्ता नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे आधारकार्ड नसते. त्यामुळे त्यांना ओळखपत्राशिवाय लस देण्यासाठी धोरण तयार करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केली होती. गुजरातने नोंदणीकृत धर्मादाय संस्था, मंदिर तसेच वयाबाबत डॉक्टरने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य मानून लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच आधारावर मुंबईतही अशा प्रकारे लसीकरण करण्यात यावे, असे शिरसाट यांनी सांगितले होते.

Last Updated : May 3, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details