मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात असताना अमली पदार्थांच्या सिंडीकेटबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनसुद्धा मुंबईत तपास केला जात आहे. या अनुषंगाने तपासादरम्यान नार्कोटिक्स कंट्रोलकडून जैद विलंत्री या आरोपीला अटक करण्यात आली होती. यानंतर, आज(गुरुवार) किल्ला न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आले होते.
न्यायालयात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक आरोपीच्या एनसीबी कोठडीची मागणी केली होती. अटक करण्यात आलेला आरोपीने कोणकोणत्या व्यक्तींना अमली पदार्थ पुरवले आहेत, याचा तपास करण्यासाठी त्याच्या एनसीबी कोठडीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, अटक झालेल्या आरोपीच्या वकीलांकडून युक्तिवाद करताना सदर आरोपीवर एनसीबीकडून गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.