मुंबई : देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्योगात मोठे योगदान आहे. कुशल कामगार ( Skilled Workers are ITI Educated ) हे आयटीआय शिकलेले ( Appeal by Mangal Prabhat Lodha ) असतात. गेल्या पाच दशकांत लाखो कामगार आयटीआयमधून ( Lakhs of Workers have Passed Out of ITI ) उत्तीर्ण होऊन विविध ठिकाणी काम करीत आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार महाराष्ट्र शासनाने ( Maharashtra Government Decided to Change ITI Syllabus ) आयटीआय अभ्यासक्रमदेखील बदलायचा ( Skill Development Minister Mangal Prabhat Lodha ) निर्णय घेतला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सूचक विधान :परवा नुकतेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी त्याच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटनदेखील झाले. त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड यांनी काही महत्त्वाचे टिपणीदेखील शासनाला केली होती. कार्यक्रमात त्यांनी नवनवीन ज्ञानाची क्षेत्र आणि नवनवीन कौशल्य हे तंत्रज्ञानामध्ये जरूरी आहे त्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना केली होती. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीदेखील कालानुरूप शिक्षण असावे, असे सूचक विधान केले होते.