महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिलीपासून शाळा सुरू नाही : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेतला जाईल - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

कृती दलाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आपले आग्रही मत मांडले. राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी शिक्षण मंत्र्यांना सुचवले. (ajit pawar suggestion to varsha gaiwad over school opening) यानंतर राज्याचे मुख्यमंत्री सध्या शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती अद्याप पूर्णतः बरी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्यासाठी आणि दिवाळीनंतर राज्यातील धोरणाचा प्रभाव कसा राहतो, हे पाहूनच या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

school
शाळा

By

Published : Nov 17, 2021, 4:47 PM IST

Updated : Nov 17, 2021, 5:52 PM IST

मुंबई -राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही कोणता ठोस निर्णय झालेला नाही. यासंदर्भात चर्चा सुरू असून कोरोनाचा प्रभाव पाहूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (minister varsha gaikwad on school opening)

दिवाळीनंतर राज्यात सर्व शाळा सुरू होतील. पहिलीपासूनच्या शाळाही सुरू होतील, अशा पद्धतीची अटकळ बांधण्यात येत होती. कोरोनाचा राज्यातील प्रभाव कमी झाल्याचे दिसत असल्याने शाळा लवकरच सुरू होतील, असे मानले जात आहे. कृती दलाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आपले आग्रही मत मांडले. राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी शिक्षण मंत्र्यांना सुचवले. (ajit pawar suggestion to varsha gaiwad over school opening)

पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप नाही -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या सूचनेचा आदर करीत या संदर्भामध्ये निश्चितच विचार केला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती अद्याप पूर्णतः बरी झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्यासाठी आणि दिवाळीनंतर राज्यातील धोरणाचा प्रभाव कसा राहतो, हे पाहूनच या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (varsha gaikwad on school opening from first standard)

हेही वाचा -मुलांचा किलबीलाट झाला सुरू, दिड वर्षापासून मुक्या असलेल्या शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

Last Updated : Nov 17, 2021, 5:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details