मुंबई - 'राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांना 'तू गप्प बस' म्हणतात. पुरामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना दमदाटी करतात. हे सरकार काय ' जनरल डायर' चे आहे काय', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
हे सरकार 'जनरल डायर'चे आहे काय? नवाब मलिक यांचा सवाल - NCP
'राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांना 'तू गप्प बस' म्हणतात. पुरामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना दमदाटी करतात. हे सरकार काय ' जनरल डायर' चे आहे काय', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पूरग्रस्त भागातील दौऱ्यात एका व्यक्तीने प्रश्न विचारला असता त्याला दमदाटी करत 'ये तू गप बस' असे विधान केले होते. सदर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
पूरग्रस्त नागरीकांचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांनी सरकार विरोधात काही प्रश्न विचारु नये म्हणून, सरकारने 12 ऑगस्ट 24 ऑगस्ट या दरम्यान जमावबंदीचा आदेश काढला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. मलिक यांनी, 'आम्ही जनतेसोबत आहोत. नागरीकही अशा सरकारला घाबरणार नाहीत. आम्ही आता सरकारला येग्य उत्तर देऊ' असा इशाराही यावेळी दिला.