मुंबई- मागच्या सरकारच्या काळात एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधात बोलल्यामुळे अनेकांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात आले. मात्र, एखाद्या विशिष्ट विचारधारेबाबत बोलणे म्हणजे शहरी नक्षलवाद आहे का ? असा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला केला आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी होत असलेल्या चौकशी संदर्भात बोलताना त्यांनी हा सवाल करत भाजपवर टीका केली आहे.
विशिष्ट विचारधारेच्या विरोधात बोलणे म्हणजे शहरी नक्षलवाद आहे का? गृहमंत्र्यांचा भाजपला सवाल - Bhima-Koregaon Home Minister Anil Deshmukh reaction
भीमा-कोरेगाव प्रकरणी शहरी नक्षलवाद संदर्भात लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, असे देशमुख यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव इथे झालेल्या दंग्यात संदर्भात चौकशी अहवाल लवकरच अपेक्षित आहे. त्यांनंतर विविध तपास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानंतरच या शहरी नाक्षलवादाचे चित्र स्पष्ट होईल, असेही अनिल देशमुख त्यांनी स्पष्ट केले.
भीमा-कोरेगाव प्रकरणी शहरी नक्षलवाद संदर्भात लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू, असेही देशमुख यांनी सांगितले. भीमा-कोरेगाव इथे झालेल्या दंग्या संदर्भात चौकशी अहवाल लवकरच अपेक्षित आहे. त्यानंतर विविध तपास अधिकाऱ्यांची बैठक घेऊ त्यानंतरच या शहरी नाक्षलवादाचे चित्र स्पष्ट होईल, असे अनिल देशमुख त्यांनी स्पष्ट केले. काही वृत्त माध्यमे या प्रकरणाला वेगळे वळण देऊ पाहत आहेत. मात्र, मागच्या सरकारच्या काळात त्यांच्या विचारधारेच्या विरोधात मत मांडणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत होते. आम्हाला यात काही तथ्य असेल असे वाटत नाही. पण, अजूनही चौकशी सुरू आहे. पूर्ण चौकशी झाल्यानंतर अंतिम निर्णयाला पोहोचता येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा-यशवंत सिन्हांनी घेतली शरद पवारांची भेट, उद्यापासून 'गांधी शांती यात्रे'ला प्रारंभ