मुंबई :जीएसटी विभागामध्ये आणि सीमा शुल्क विभागामध्ये उच्च पदावर कार्यरत महसूल अधिकारी सचिन सावंत यांना आज ईडी न्यायालयाने 11 जुलै पर्यंत रिमांड दिलेला होता. चौकशी होण्यासाठी न्यायालयामध्ये ईडीने दावा केला होता. अखेर विशेष पीएमएलए न्यायालयाने 25 जुलैपर्यंत आता न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सचिन सावंत यांच्या वकिलांचा दावा :अंमलबजावणी संचालनालयाने महसूल अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये अनेक कागदपत्रे आणि महत्त्वाचे दस्तावेज ईडीच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाले, असा त्यांनी दावा केला. त्यानंतर त्यांनी तातडीने रिमांड मिळावा, असा अर्ज न्यायालयामध्ये केला होता. विशेष पी एम एल ए न्यायालयाचे न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी उपलब्ध दस्तावेज आणि कागदपत्रांच्या आधारे सचिन सावंत यांना 11 जुलैपर्यंत रिमांड आज दिला होता. आज झालेल्या सुनावणीमध्ये सचिन सावंत यांच्या बाजूने दावा केला गेला की, चौकशीमध्ये सहकार्य होत आहे. त्यामुळे आता ईडी कोठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयीन कोठडीची गरज व्यक्त केली.