महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आयआरसीटीसीकडून 22 राज्यात ई-बस आरक्षण सेवा सुरू - bus reservation service in 22 states

आतापर्यंत आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे, विमान आणि क्रूज तिकिटांचे आरक्षण करण्याची सुविधा दिली आहे. आता याच बरोबर प्रवाशांच्या सुविधेसाठी बस तिकिटांचे सुद्धा आरक्षण करता येणार आहे. ही सेवा देशातील 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध आहे.

आयआरसीटीसीकडून 22 राज्यात ई-बस आरक्षक सेवा सुरू,
आयआरसीटीसीकडून 22 राज्यात ई-बस आरक्षक सेवा सुरू,

By

Published : Feb 19, 2021, 5:04 PM IST

मुंबई -प्रवाशांना तिकीट बुकिंग सोपे आणि सुलभ होण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने आता बस तिकिटांची देखील आरक्षण सुविधा सुरु केली आहे. रेल्वे आणि विमानाचे तिकीट काढण्याबरोबरच बसचे सुद्धा आरक्षण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

आयआरसीटीसीकडून 22 राज्यात ई-बस आरक्षक सेवा सुरू
22 राज्यात सुविधा सुरूइंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यस्थापक राहुल हिमालियन यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, आयआरसीटीसीकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात आले आहेत. आतापर्यंत आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे, विमान आणि क्रूज तिकिटांचे आरक्षण करण्याची सुविधा दिली आहे. आता याच बरोबर प्रवाशांच्या सुविधेसाठी बस तिकिटांचे सुद्धा आरक्षण करता येणार आहे. ही सेवा देशातील 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात उपलब्ध आहे. 50 हजार खाजगी बस ऑपरेटर आणि राज्य परिवहनाच्या बसेस आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. अशी करा बस तिकीट बुक

सर्वप्रथम प्रवाशांना बसची तिकीटे बुक करण्यासाठी www.bus.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर संकेतस्थळवर प्रवासाची तारीख टाकल्यास तुम्हाला कोणत्या मार्गावर कोणती बस उपलब्ध आहे हे बघता येणार आहे. त्यानुसार बस मार्ग निवडल्यानंतर प्रवासाचा कालावधी आणि वेळ दिसेल त्यासोबत तिकिटाचे शुल्क आणि किती तिकीट शिल्लक राहिलेले आहे. तेसुद्धा दाखवण्यात येणार आहे.

प्रवाशांना होणार फायदा
आयआरसीटीसी संकेतस्थळावर ज्याप्रमाणे रेल्वेची टिकीट बुक करताना आसन निवडतो, त्याच प्रमाणे प्रवाशांना बसमधील पाहिजे ते आसन निवडता येणार आहे. तसेच तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना बसचा मार्ग, बसमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि रिव्ह्यू सुद्धा बघता येणार आहे. इतकेच नव्हे तर बँक आणि वॉलेटच्या माध्यमातून बस तिकीट आयआरसीटीसीच्या बुक करणाऱ्या प्रवाशांना डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या महिलेला मिळणार फाशी, जाणून घ्या काय आहे गुन्हा?

ABOUT THE AUTHOR

...view details