मुंबई :मुंबई पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या आणि पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर वाटप प्रकरणासंदर्भात इक्बालसिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले आहे. सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदारांना मुंबई आणि पुण्यातही कोविड केंद्र देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. उद्योगपती सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. संजय राऊत यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणातही त्यांची चौकशी करण्यात आली होती. पत्रा चाळ प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने सुजित पाटकर यांच्या घराची झडती घेतली होती. पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुलींसह मॅग्पी डीएफएस प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या वाईन वितरण कंपनीत अतिरिक्त संचालक होते.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी : रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या रेकॉर्डनुसार 16 एप्रिल 2021 रोजी पाटकर आणि संजय राऊत यांच्या मुलींची फर्ममध्ये अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडेच राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कंपनीचा मुख्य व्यवसाय वाइन ट्रेडिंगमध्ये बदलल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. कोविड फील्ड हॉस्पिटल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्योगपती सुजित पाटकर यांनी मुंबई महापालिकेसोबत करार केल्यानंतर सुमारे एका वर्षानंतर करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी त्यांच्या कंपनीच्या खात्यात 32 कोटी रुपये जमा झाले आणि यासंबंधीची काही कागदपत्र अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या घरी छापेमारी करताना सापडले होती.