मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीरपणे फोन टॅपिंगप्रकरणी ( Illegal phone tapping case ) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करत समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली ( Rashmi Shukla Clean chit in phone tapping case ). येत्या काही दिवसात मुंबईला महिला पोलीस आयुक्त मिळणार ( Women Commissioner of Mumbai Police ) असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
सध्या हैद्रराबाद येथे कार्यरत : फोन टॅपिंग प्रकरणात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांचे नाव मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्त म्हणून चर्चेत आहे. रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचचे आयपीएस आधिकारी आहे. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. येत्या काळात आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाआधीच या बदल्या केल्या. या बदल्यांबाबत रोज नवनवीन अंदाज बांधले जात होते. आज रश्मी शुक्ला या मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्त होणार असल्याची चर्चा आहे. त्यांना या सर्व प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे.