महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

IPS Transfer : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती - ips officers transfer

राज्यातील वरिष्ठ आयपीएस (IPS Transfer) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच राज्यातील विविध आयपीएश अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 13, 2022, 10:44 PM IST

Updated : Dec 13, 2022, 10:53 PM IST

मुंबई : राज्यातील आयपीएस (IPS Transfer) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीसुद्धा बदली झाली आहे. त्यांची ACB च्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनासुद्धा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.

अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त - नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जयंत नाईकनवरे यांनी नाशिकसह सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष उपक्रम राबविले. यात प्रामुख्याने रात्री फिरते बॅरिकेडींग विशेष उल्लेखनीय आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी हेल्मेट सक्तीबाबत मोहीम सुरू केली होती.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली - पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली करण्यात आली असून, रितेश कुमार आत्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली असून, त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे.

मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर प्रशांत बुरडे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक असतील. सत्यनारायण चौधरी हे बृहन्मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलिस सह आयुक्त असतील. नितीश मिश्रा यांची बृहन्मुंबई आर्थिक गुन्हे पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांची पिपरीवरून बदली करण्यात आली असून ते आता नाशिकचे पोलिस आयुक्त असतील. प्रवीण पवार हे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील तर सुनिल फुलारी हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील.

अमरावतीच्या आयुक्त डॉ. आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये बदली - अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी आता नविनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलिस आयुक्त असतील. अमरावतीत डॉ. आरती सिंह यांची कारकीर्द गाजली. आरती सिंह यांची बदली करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत तक्रारही केली होती.

मिलिंद भारंबे नवी मुंबईचे आयुक्त - विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्तपदी झाली आहे. तर वाहतूक पोलिस सह आयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी झाली आहे. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. तर अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील.

Last Updated : Dec 13, 2022, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details