महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यासह तेरा पोलिसांना कोरोनाची लागण - mumbai corona update

मुंबई पोलीस खात्यातील एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांना कोरोना होण्याच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असून पोलिसांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 5, 2020, 10:11 AM IST

मुंबाई- पोलीस खात्यातील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या आयपीएस अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून सध्या ह्या अधिकाऱ्याला विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय गाडीच्या चालकाला कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर या आयपीएस अधिकाऱ्याने स्वतः कोरोनाची टेस्ट केल्यानंतर ती वैद्यकीय अहवाल हा पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा एकदा पोलीस खात्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे 12 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल सोमवारी (दि. 5 मे) पाॅझिटिव्ह आला होता. त्या 12 पोलीस अधिकाऱ्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या 48 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे मार्ग पोलीस ठाण्यात बंदोबस्तावर तैनात असलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या नंतर संबंधित पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या झोन 1 चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details