मुंबई- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजेच 'कॅब' केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत मंजूर करून घेतल्यानंतर या विरोधात आता आंदोलन केली जात आहेत. कॅब विधेयक हे मुस्लीम समाजासह अनेक धर्म व गरिबांविरोधी असून या विधेयकामुळे कलम 14, 15 आणि कलम 25 चे उल्लंघन होत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
'कॅब'चा मुस्लिमांसह अनेक धर्म, गरिबांना सहन करवा लागणार त्रास - आयपीएस अधिकारी
नागरिकता दुरूस्ती विधेयक भारतीय संविधानाच्या विरोधात असून याचा त्रास मुस्लिमांसह अनेक धर्म आणि गरिबांना होणार असल्याची प्रतिक्रीया आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांनी दिली.
ईटीव्ही भारतशी बोलताना अधिकारी अब्दूर रहमान
नागरिकता दुरुस्ती विधेयक हे भारतीय संविधानाच्या विरोधात असून हे विधेयक केवळ मुस्लीम समाजासोबत भेदभाव करणारे नसून दलित, ओबीसी व दारिद्र्य रेषेखालील समाजावर अन्याय करणारा आहे, असे अब्दूर रहमान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
हेही वाचा - ''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'
Last Updated : Dec 14, 2019, 7:38 PM IST