महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचरामुक्त मुंबई अभियानात महापौरांना डावलले -महापौर प्रशासनाला विचारणार जाब - Mumbai

पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 'कचरामुक्त मुंबई अभियान' सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला आपल्याला डावलल्याने महापौर पदाचा अपमान झाला असून, सभागृहात याबाबत आपण जाब विचारणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

By

Published : Jul 30, 2019, 12:04 PM IST

मुंबई- येथील पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 'कचरामुक्त मुंबई अभियान' सुरू करण्यात आले. या कार्यक्रमाला आपल्याला डावलल्याने महापौर पदाचा अपमान झाला असून, सभागृहात याबाबत आपण जाब विचारणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 'कचरामुक्त मुंबई अभियान' या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमाला महापौरांना मात्र आमंत्रण नव्हते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलावले त्याबद्दल मला राग नाही. 'कचरामुक्त मुंबई अभियान', कार्यक्रमाला महापौर म्हणून मला पाचारण करायला हवे होते. तो कार्यक्रम महापालिका आणि पोलीस यांचा संयुक्त कार्यक्रम होता का? याची माहिती घेतली जाईल. पालिकेचा कार्यक्रम असून जर महापालिकेने या कार्यक्रमाला बोलावले नसेल तर तो माझा अपमान आहे. याबाबत महापौर पदाचा अपमान केला म्हणून सभागृहात जाब विचारला जाईल असे ही महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details